For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन बीपीएल कार्ड वितरणासाठी प्रस्ताव

12:41 PM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
नवीन बीपीएल कार्ड वितरणासाठी प्रस्ताव
Advertisement

लाभार्थ्यांना प्रतीक्षा : सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष 

Advertisement

बेळगाव : अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत नवीन बीपीएल (प्राधान्य कुटुंब) आणि एपीएल (नॉन प्रायॉरिटी फॅमिली) शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून कार्डसाठी प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्षात नवीन कार्ड वितरण कधी होणार, याबाबत चिंता कायम आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी नवीन शिधापत्रिकांसाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर नवीन रेशनकार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. यापूर्वी केवळ नोंदणीकृत ई-श्रम लाभार्थ्यांना बीपीएल कार्डचे वितरण झाले. मात्र, इतर सर्वसामान्यांना कार्डपासून दूर राहावे लागले आहे. अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे अर्जही रद्द झाले आहेत.

मागील दोन वर्षांपासून नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. शिवाय नवीन रेशनकार्डसाठी अर्ज प्रक्रियाही थांबविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ लागले आहेत. विशेषत: शासकीय सुविधा आणि मासिक रेशनपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे नवीन रेशनकार्डकडे लाभार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत. काहींनी खोटी कागदपत्रे पुरवून बीपीएल कार्डे मिळविली आहेत, अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन कार्डे रद्द करण्यात आली आहेत. बीपीएलमधून एपीएलमध्ये कार्डे हस्तांतरित करण्यात आली आहेत. नवीन बीपीएल कार्ड वितरण प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत मंत्री मुनियप्पा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे नवीन बीपीएल कार्डसाठी मंत्रिमंडळ काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.