For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सप खासदाराची संपत्ती ईडीकडून जप्त

06:41 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
सप खासदाराची संपत्ती ईडीकडून जप्त
Advertisement

अखिलेश यादव यांच्या सहकाऱ्याला दणका

Advertisement

वृत्तसंस्था/ जौनपूर

उत्तरप्रदेशच्या जौनपूरचे समाजवादी पक्षाचे खासदार बाबू सिंह कुशवाह यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या टीमने लखनौच्या कानपूर रोड भागातील कोट्यावधींची संपत्ती ईडीच्या टीमने जप्त केली आहे. या कारवाईनंतर उत्तरप्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Advertisement

समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. अशास्थितीत सप खासदाराच्या विरोधात कारवाई झाल्याने इंडिया आघाडी संतप्त होणार हे निश्चित आहे. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मायावती सरकारमध्ये मंत्री राहिलेले बाबू सिंह कुशवाह यांच्या विरोधात सप अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेसकडूनच यापूर्वी आरोप करण्यात आले होते. एनएचआरएम घोटाळ्यात बाबू सिंह कुशवाह यांचा हात असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनीच केला होता. या घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री बाबू सिंह कुशवाह आणि त्यांचे निकटवर्तीय सौरभ जैन यांना आरोपी करण्यात आले हेत. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने 14 फेब्रुवारी 2012 रोजी पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. यानंतर ईडीने छापे टाकत अनेक दस्तऐवज ताब्यात घेतले होते. बाबू सिंह कुशवाह याप्रकरणी तुरुंगातही गेले आहेत.  हा घोटाळा सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा होता.

बाबू सिंह कुशवाह विरोधात मागील 12 वर्षांमध्ये अनेकदा कारवाई झाली आहे. दिल्ली, लखनौ आणि जौनपूर येथे त्यांच्या विरोधात कारवाई झाली आहे. पीएमएलए अंतर्गत सपच्या खासदाराच्या विरोधात आता कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी ईडी कारवाई करत असल्याचे भाजपकडून म्हटले गेले आहे.

Advertisement
Tags :

.