For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेवा ज्येष्ठतेनुसार बढती द्यावी

11:10 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सेवा ज्येष्ठतेनुसार बढती द्यावी
Advertisement

पीएसटी शिक्षकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

बेळगाव : प्राथमिक शाळांमध्ये मागील अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या पीएसटी शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढती द्यावी, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांना देण्यात आले. निवेदन देण्यासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शेकडो प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांसोबतच जिल्हाधिकारी तसेच जि. पं. सीईओंनाही निवेदन देण्यात आले. शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा शिक्षक व पदवीधर शाळा शिक्षक असे दोन गट तयार केले आहेत. 2016 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांची प्राथमिक शाळा शिक्षक म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यानंतरच्या शिक्षकांना मात्र पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून नोंद करण्यात आल्याने बढती तसेच बदलीमध्ये त्यांना अधिक जागा उपलब्ध होत आहेत. पीएसटी शिक्षकांची संख्या अधिक असल्याने त्यांना सेवाज्येष्ठतेनुसारच बढती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिक्षकांनी केली.

बेंगळूर येथे 12 रोजी राज्यस्तरीय आंदोलन होणार

Advertisement

यासंदर्भात सोमवार दि. 12 रोजी बेंगळूर येथे राज्यस्तरीय आंदोलन होणार आहे. त्यापूर्वी बेळगावमधील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बुधवारी दुपारी क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात शेकडोंच्या संख्येने प्राथमिक शाळा शिक्षक जमा झाले होते. त्यांनी शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांना निवेदन दिले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या.

Advertisement
Tags :

.