For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ प्राथ. शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकपदी बढती द्या

10:29 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्येष्ठ प्राथ  शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकपदी बढती द्या
Advertisement

खानापुरातील शिक्षकांचे आमदार - संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

वार्ताहर/नंदगड

प्राथमिक शाळा शिक्षकांनी कित्येक वर्षे आपली शिक्षकाची सेवा बजावलेली आहे. परंतु सरकारच्या जाचक नियमामुळे कित्येक वर्षे काम करूनही त्यांना मुख्याध्यापकपदी बढती मिळत नसल्याने संतप्त झालेल्या प्राथमिक शाळा शिक्षकांनी खानापूर तालुक्यातील विविध अधिकाऱ्यांना व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन दिले. यापूर्वी सेवाज्येष्ठतेच्या आधारे मुख्याध्यापकपदी शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून बढती दिली जात होती. मात्र आता त्यामध्ये जीपीटी (पदवीधर) शिक्षकांनी 50 टक्केची राखीवता मुख्याध्यापक भरतीमध्ये केली आहे. त्यामुळे याला ज्येष्ठ शिक्षकांचा विरोध आहे. मुख्याध्यापक पदासाठी अनुभवी शिक्षकांची गरज असते. मात्र 2017 नंतर नेमणूक झालेले शिक्षक त्या पदावरती आपला दावा करत आहेत. हे चुकीचे आहे.

Advertisement

पूर्वीप्रमाणे ज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी भरती द्यावी, अशी मागणी केली गेली आहे. त्याचबरोबर 2017 च्या नियमानुसार पहिली ते पाचवी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी प्रायमरी स्कूल टीचर व सहावी ते आठवी शिकवणाऱ्या शिक्षणासाठी ग्रॅज्युएट प्रायमरी टीचर अशी वर्गवारी केली आहे. यामुळे पहिल्यांदा पहिली ते सातवी शिकवणारे शिक्षकांचे डिमोशन झाले आहे. मात्र यापूर्वी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांमध्ये बरेचसे शिक्षक ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यामुळे पात्र शिक्षकांना सहावी ते आठवी शिकवण्यासाठी पदोन्नती द्यावी व त्यांना जीपीटी शिक्षक असे संबोधण्यात यावे.

कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटना बेंगळूर तालुका, जिल्हा शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. सोमवारी खानापूर तालुक्यामधील अनेक शिक्षकांनी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, तहसीलदार व क्षेत्र शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदन स्वीकारून आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, मीही एक शिक्षकच होतो. त्यामुळे शिक्षकांच्या समस्यांची मला चांगली जाणीव आहे. सरकारी इतर खात्यामध्ये ज्येष्ठतेप्रमाणेच प्रमोशन दिले जाते.

त्याचबरोबर नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार पात्र शिक्षकांनाही वरील वर्ग शिकवण्यासाठी प्रमोशन मिळाले पाहिजे. त्यासाठी विधानसभेमध्ये या विषयावर प्राथमिक शिक्षण मंत्री यांच्या निदर्शनास ही बाब मी आणून देणार आहे. व समस्या सुटेपर्यंत मीही त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीन, अशी ग्वाही दिली. यावेळी खानापूर तालुका शिक्षक संघटनेचे आय. बी. सनदी, पी. जी. पाखरे, बी. एम. यळ्ळूर, एस. एल. हळदणकर, आय. बी. पुजारी, वाय. एम. पाटील, एम. आर. चवलगी, बी. बी. चापगावकर, के. एच. कौंदलकर व अन्य शिक्षक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.