आजपासून बेळगाव-बाची रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना निवेदन
वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ते बाची कर्नाटक हद्दीतील रस्त्याची दुऊस्ती करण्यासंदर्भात बेळगावच्या पश्चिम भागातील सात ग्रामपंचायत व इतर नागरिकांमार्फत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेऊन लागलीच रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु मुसळधार पावसामुळे पुन्हा जैसे थी परिस्थिती होऊन बेळगाव ते बाचीपर्यंत रस्ता खड्डेमय झाला आहे. याकरिता बेळगावच्या पश्चिम भागातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी असिस्टंट कमिशनर विजयकुमार वनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत बांधकाम खात्याला कळविण्याचे आश्वासन दिले. यानंतर या शिष्टमंडळाने बांधकाम खात्याचे वरिष्ठ अभियंता एस. एस. सोब्रद व असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर शशिकांत कोळेकर यांना निवेदन दिले. गुऊवारपर्यंतची अवधी देऊन या अवधीत महात्मा गांधी पुतळा ते बाचीपर्यंत रस्त्याची दुऊस्ती झाली नाही तर शुक्रवारपासून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. यावेळी शिष्टमंडळाला विश्वासात घेऊन मंगळवार दि. 22 पासून रस्ता दुऊस्ती करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे, हिंडलगा ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मनोळकर, लक्ष्मण खांडेकर, निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर, बसवंत एन. बेनके, निंगाप्पा देसूरकर, मधु बेळगावकर, विशाल चौगुले, प्रवीण काळभैरव, यल्लाप्पा पाटील, एन. वाय. चौगुले होते. गणपती मंदिर ते सुळगा (हिं) पर्यंत चारपदरी रस्ताकाम पावसाळ्dयानंतर काम हाती घेतले जाणार असल्याचे सांगितले. रस्ता मिलिटरी गणपती मंदिर ते सुळगा (हिं) पर्यंत मंजूर झाला आहे. त्यामुळे ते काम लागलीच हाती घेतले जाणार असल्याचे सांगितले. महात्मा गांधी पुतळा ते गणपती मंदिरपर्यंतचा रस्ता कॅन्टोन्मेंट हद्दीत आजपर्यंत होता.. याबाबत खास प्रयत्न करून केंद्र सरकारमार्फत रस्त्याबाबतीत मंजुरी मिळविली आहे. कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन रस्ताकाम केले जाणार असल्याचे सांगितले.
चारपदरी रस्त्यासाठी विनंती
शिष्टमंडळाने बाचीपर्यंत म्हणजेच कर्नाटक हद्दीपर्यंत चारपदरी रस्ता करण्यासंदर्भात विनंती केली. परंतु या रस्त्याबाबत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही..यासाठी आपणदेखील केंद्र सरकारमार्फत हा रस्ता होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. हैदराबाद ते पणजी-गोवा हा नवीन रस्ता मंजूर झाल्याने रायचूर-बाची या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत देखील प्रयत्न केला जाणार असून आपण केंद्र सरकारमार्फत मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले.