Sangli Crime : गंभीर गुन्ह्यांमुळे कडेगावात पितापुत्रावर हद्दपारीची कारवाई
सांगली जिल्ह्यातून माळी पिता-पुत्रांना हद्दपार
कडेगांव : कडेगांवातील शिवाजी गणपती माळी (वय ६३) व उमेश शिवाजी माळी (वय २८, दोघे रा. कडेगाव) या पिता पुत्रावर पलूस-कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांनी हद्दपारची कारवाई केली आहे.
सहायक निरीक्षक गणेश कोकाटे, सुभाष माळी यानी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. न्यायालयामधून उमेश माळीजामिनावर बाहेर असल्याने त्यांच्यामुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका पोहोचत असून त्यांच्याविरुद्ध असलेल्या गंभीर गुन्ह्यांची माहिती संकलित करून तत्कालिन पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी पोलीस अधिक्षक सांगली यांच्यामार्फत उपविभागिय दंडाधिकारी, कड़ेगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
या गंभीर गुन्ह्याबाबत प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी कडेगाव शहरातील या पिता-पुत्रांवर सिद्धदोष अपराधी म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५७ (अ) (१) प्रमाणे सांगली जिल्ह्यामधून १ वर्षाकरीता हद्दपार केले आहे. सदरची कारवाई कडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक गणेश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.