महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केएलई शेषगिरी कॉलेजमध्ये प्रकल्प प्रदर्शनाची सांगता

06:32 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी शेषगिरी कॅम्पसने 19 जून रोजी प्रयोगवर्ष-2024 व अविन्या वर्ष-2024 असे प्रकल्प प्रदर्शन भरविले होते. प्रथम वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. बेळगाव परिसरात कोणते ‘सोशल इनोव्हेशन कोर्स’ सुरू करता येतील, याचा विचार या प्रकल्पामध्ये करण्यात आला होता.

Advertisement

एकूण 550 विद्यार्थ्यांनी प्रयोग वर्षमध्ये 75 व अविन्या वर्षमध्ये 55 प्रकल्प सादर केले. 40 प्राध्यापकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. मूल्यमापन केल्यानंतर एकूण 8 संघांना बक्षीस देण्यात आले. यावेळी ना नफा ना तोटा तत्वावर काम करणाऱ्या संस्थेने प्रकल्पाला भेट दिली व यातील काही प्रकल्प हाती घेऊन त्यासाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. शहरातील दहा शाळांच्या 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी प्रा. एस. बी. कुलकर्णी, प्रा. एस. बी. यादवाड यांनी विशेष पुढाकार घेतला. बक्षीस वितरणप्रसंगी प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील यांनी स्वागत केले. एशिया पॅसिफिकचे अमित पाठक तसेच हुबळी तांत्रिक विद्यापीठाचे मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रा. प्रिया मुरगोड, प्रा. अनिता शिरोळ व प्रा. पूजा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article