मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
कोल्हापूर :
निवडणूकीसाठी जिह्यातील मतदारसंघासाठी नेमलेले मतदान केंद्र व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्रापासून नेमून दिलेल्या परिसरात मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून व मतदाना दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिह्यातील मतदान केंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केले आहेत.
केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट इत्यादी बाळगणे, वापरणे अथवा मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करण्यासही बंदी घातली आहे. (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून), घालण्यात आली आहे. मतदान केंद्रातील प्रतिनिधी व इतर प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे, मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगणे.(सुरक्षेच्या कारणास्तव नेमलेले पोलीस अधिकारी,कर्मचारी वगळून.) यास मनाई आहे.
जिह्यातील 10 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या उमेदवारांच्या सोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बुथ स्थापित करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरण्यास बंदी आहे.