काम पूर्ण केल्याशिवाय बाहेर पडण्यास मनाई
जर तुम्ही काम टाळण्याची सवय म्हणजेच प्रोक्रास्टिनेशनने त्रस्त असाल तर जपानचा एक कॅफे तुमच्यासाठी एखाद्या जादुई ठिकाणापेक्षा कमी नाही. टोकियोचा मॅन्यूस्क्रिप्ट रायटिंग पॅफे लोकांकडून काम वेळेत संपविण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबितो, यामुळे इच्छा असूनही लोकांना तेथे काम अपूर्ण ठेवून बाहेर जाता येत नाही.
या कॅफेत तुमच्याकडे एखादे असे काम आहे, जे तुम्ही एका निश्चित वेळेत पूर्ण करू इच्छित असाल तरच प्रवेश मिळतो. तसेच जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोवर या कॅफेतून बाहेर पडता येत नाही.
या कॅफेत प्रवेश करताच लोक स्वत:चे नाव, दिवसाचे काम आणि काम पूर्ण करण्यासाठीची वेळ नमूद करतात. यानंतर अनलिमिटेड कॉफी, चहा, स्नॅक्स आणि हाय-स्पीड वाय-फाय उपलब्ध होते. हा कॅफे केवळ 10 लोकांसाठी निर्माण करण्यात आला आहे. विशेषकरून येथे लेखक, संपादक, मंगा आर्टिस्ट आणि लिहिणे-वाचण्याच्या कामांमध्ये डेडलाइनचा ताण सहन करणारे लोक येतात.
येथे मिळणाऱ्या सुविधांमध्ये अनलिमिटेड कॉफी आणि चहा, अनलिमिटेड स्नॅक्स, हायस्पीड वाय-फाय, प्रत्येक सीटवर डॉकिंग पोर्ट आणि चार्जिंग पॉइंट अणि अत्यंत शांत आणि फोक्स्ड वातावरण सामील आहे. काम संपण्यापूर्वी कुणीच बाहेर जाऊ शकत नाही ही या कॅफेची सर्वात मोठी आहे.
स्टाफ एक तासात 6 वेळापर्यंत कामातील प्रगती पाहण्यासाठी येतात. जर तुम्ही लक्ष केंद्रीत करू शकत नसाल तर ते प्रोत्साहित करतात. वातावरण काहीसे तणावपूर्ण वाटत असले तरीही तेथे अत्यंत रचनात्मक काम होते असे तेथे जाणाऱ्या लोकांचे सांगणे आहे.
कॅफेची सुरुवात कशी झाली
या कॅफेची सुरुवात रिमोट वर्क वेगाने वाढत असताना आणि लोक घरात लक्ष केंद्रीत करू शकत नसताना झाली होती. स्वत:च्या कामाबद्दल जबाबदार करणारे आणि निश्चित वळेत काम पूर्ण करता येईल असे ठिकाण लोकांना मिळावे, अशी कॅफे मालकाची इच्छा होती. या कल्पनेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. काम पूर्ण होताच ग्राहकांना ‘टास्क कम्प्लीटेड’युकत स्टीकर दिला जातो, जो दाखवून ते कॅफेतून बाहेर पडू शकतात.