महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोमवारी सायंकाळपासूनच जमावबंदी

11:31 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांचा आदेश

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये तर चिकोडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चिकोडी येथील आर. डी. पीयु कॉलेजमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 3 जूनच्या सायंकाळी 5 पासून बुधवारी 5 जूनच्या सकाळी 7 पर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. कारवार लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील कित्तूर व खानापूर तालुक्यातही हा आदेश लागू असणार आहे. या काळात पाचहून अधिक जण गटागटाने फिरू नये, सार्वजनिक व राजकीय सभा किंवा मिरवणुका काढू नयेत, मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पाचहून अधिक जणांनी गटागटाने फिरू नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. जमावबंदीच्या काळात लाठी, भाले, तलवार, गदा, बंदूक, चाकू व इतर कोणतीही घातक शस्त्रs घेऊन फिरू नये. दगड व स्फोटक पदार्थ साठवणे आणि घेऊन फिरण्यावरही बंदी असणार आहे. या काळात प्रतिकात्मक प्रतिमा दहन करण्यावरही बंदी असणार आहे. अंत्ययात्रा, लग्न, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांना हा आदेश लागू असणार नाही. मात्र, असे कार्यक्रम निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेत करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article