वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याने ज्ञान प्रबोधन मंदिरात कार्यक्रम
12:33 PM Nov 08, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्ञान प्रबोधन मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला.शाळेच्या एनसीसीच्या एएनओ थर्ड ऑफिसर अक्षता चौगुले यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व वंदे मातरम् गीताचे महत्त्व सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळात या गीतामुळे अनेकांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी प्रेरणा मिळाली, असे त्या म्हणाल्या. प्राचार्य मंजिरी रानडे यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ पुस्तकाबद्दल तसेच वंदे मातरम् गीताचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. भाविका कामते हिने सूत्रसंचालन केले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article