For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाईव्ह टीव्ही कार्यक्रमात प्राध्यापकाचा मृत्यू

06:43 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
लाईव्ह टीव्ही कार्यक्रमात प्राध्यापकाचा मृत्यू
Advertisement

केरळमधील घटना : संवाद सुरू असतानाच खुर्चीवरून कोसळले, व्हिडिओ व्हायरल

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरवनंतपुरम

केरळमधील दूरदर्शन वाहिनीवरील लाईव्ह शोमध्ये सहभागी झालेल्या कृषी तज्ञाचा व्यासपीठावरच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. अनी एस. दास (59 वर्षे) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement

केरळमधील दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये थेट कार्यक्रमादरम्यान एक कृषी तज्ञ अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. केरळ कृषी विद्यापीठाचे संचालक असलेले 59 वषीय डॉ. ए. एस. दास हे चॅनलवरील एका कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना बेशुद्ध झाले. ही घटना दूरदर्शनच्या कृषी दर्शन कार्यक्रमादरम्यान संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली. बेशुद्ध झाल्यानंतर कृषी तज्ञांना तातडीने ऊग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे चॅनलच्या सूत्रांनी सांगितले. डॉ. अनी एस. दास हे केरळ कृषी विद्यापीठात नियोजन संचालक होते. कृषीतज्ञ म्हणून ते दूरदर्शनच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असत.

Advertisement
Tags :

.