महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेजससाठी इंजिन पुरविण्यास चालढकल

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत-रशिया मैत्री : अमेरिकेकडून कराराचे पालन करण्यास टाळाटाळ

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

Advertisement

चीन आणि पाकिस्तान या दोन आघाड्यांवर मोठ्या धोक्यांना तोंड देणाऱ्या भारताला सध्या लढाऊ विमानांची निनांत गरज आहे. वायुदलाच्या लढाऊ विमानांचा ताफा सातत्याने कमी होतोय. याचमुळे भारताने  तेजस एमके-1ए लढाऊ विमानाची जलद निर्मिती करण्याचे प्रयत्न चालविले आहेत, परंतु याकरता आता अमेरिकेचा अडथळा निर्माण झाला आहे. तेजस विमानात अमेरिकेचे इंजिन एफ404-आयएन20 बसविले जाणार आहे, या इंजिनची निर्मिती जीई कंपनी करते. हे इंजिन पुरविण्यास अमेरिका आता चालढकल करत असल्याने तेजसच्या निर्मितीला फटका बसत आहे. पुरवठासाखळीत येत असलेल्या अडचणींमुळे इंजिन पुरविण्यास विलंब होत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे, परंतु भारत आणि रशियाच्या मैत्रीशी या प्रकाराला जोडून पाहिले जात आहे.

अमेरिकेच्या विलंबामुळे आता भारतीय वायुदलाला निश्चित कालावधीत पुरेशी तेजस लढाऊ विमाने मिळू शकणार नाहीत. भारतीय कंपनी एचएएल एकूण 16 तेजस लढाऊ विमाने निर्माण करून सोपविणार होती, परंतु इंजिन न मिळाल्याने अद्याप यात प्रगती होऊ शकलेली नाही. नोव्हेंबरमध्ये पहिले विमान उपलब्ध करणार असल्याचे एचएएलने आता म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात 8 तेजस मिळतील अशी अपेक्षा वायुदलाला आहे. तर अमेरिकेच्या कंपनीकडून एकही एफ404-आयएन20 इंजिन पुरविण्यात आलेले नाही. नोव्हेंबर महिन्यापासून इंजिन्सचा पुरवठा सुरू करणार असल्याचे जीईने म्हटले. भारतात पुढील वर्षी मिग 21 बायसन लढाऊ विमाने वायुदलाच्या ताफ्यातून निवृत्त होणार आहेत. यामुळे तेजसचा वेळेत पुरवठा आवश्यक आहे. तेजससाठी इंजिन पुरविण्यास होत असलेल्या विलंबामुळे अमेरिकेच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भारताने आता लढाऊ विमानांच्या इंजिनसाठी अन्य पर्यायांची निवड करावी असा सल्ला अनेक तज्ञ देत आहेत. इंजिन उपलब्ध करण्यास होत असलेल्या विलंबामुळे भारतीय वायुदलावर प्रभाव आहे.

अमेरिका नाराज

भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद असताना तेजसच्या इंजिन पुरवठ्यात विलंब होत आहे. यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू, रशिया आणि मानवाधिकाराचा मुद्दा सामील आहे. अमेरिकेने पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यावर उघडपणे नाराजी दर्शविली होती. रशियासोबतची मैत्री कमी करण्यासाठी अमेरिका सातत्याने भारतावर दबाव टाकत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article