कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात बेरोजगारांची समस्या जटिल

12:21 PM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रिक्त पदे भरण्यास सरकारची अनास्था

Advertisement

बेंगळूर : राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रतिवर्षी वाढतच आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. एका माहितीनुसार राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये पदे रिक्त असलेली संख्या सुमारे 2 लाख 70 हजार असून रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने त्वरित पाऊले उचलल्यास बेरोजगारी काही अंशी दूर होईल. शालेय शिक्षण-साक्षरता खाते, पोलीस खाते, वैद्यकीय शिक्षण खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्र, नगर आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील ऊग्णांना जिल्हा ऊग्णालय किंवा बेंगळूरला यावे लागत आहे. आरोग्य खात्यामधील पदे सरकार कंत्राटी पद्धतीने भरत असल्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तऊण-तऊणींना सरकारी नोकरी मिळत नाही. 10 वर्षांपूर्वी राज्याची लोकसंख्या 5 कोटी होती. त्या काळात मंजूर झालेली पदे अद्यापही रिक्तच आहेत. आता लोकसंख्या वाढीनुसार सरकारने विविध खात्यांसाठी नवी पदे मंजूर करून नेमणूक प्रक्रिया सुरू करावी, अशी सुशिक्षित बेरोजगारांकडून आग्रही मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article