29 ऑगस्टपासून प्रो कबड्डीच्या हंगामाला प्रारंभ
प्रो कबड्डी लीगचा 12 वा हंगाम 29 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 11 रोमांचक हंगामाच्या यशानंतर पीकेएल आता एका नवीन आणि उत्साही पर्वात प्रवेश करत असल्याचे आयोजकाकडून सांगण्यात आले. मागील दोन हंगामात पीकेएलला चांगला प्रतिसाद मिळाला होता, यंदाही हाच उत्साह कायम ठेवत नव्या हंगामात पहायला मिळेल असे आयोजकाकडून सांगण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या लिलावाद्वारे सर्व बाराही संघांनी आपली ताकद वाढवली आहे, त्यामुळे यंदाचा हंगाम प्रेक्षकांना अद्वितीय स्पर्धा आणि मनोरंजन देणार, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. 2 व्या हंगामाचे सामने कुठे खेळवले जाणार हे अद्याप जाहीर करण्यात आले नसले, तरी त्याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
पीकेएल सीझन 12 च्या सुरुवातीची तारीख जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या वर्षीच्या ऐतिहासिक खेळाडू लिलावात 10 खेळाडूंनी 1 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला, ज्यामुळे यंदाचा हंगाम अधिक स्पर्धात्मक होणार आहे. चाहत्यांना कब•ाrचा आणखी एक थरारक अध्याय दाखवण्याची आम्हाला उत्सुकता असल्याचे प्रो कबड्डी लीगचे कमिनशर अनुप गोस्वामी यांनी सांगितले.
दरम्यना, प्रो कब•ाr लीग सीझन 12 चा लिलाव मुंबई येथे 31 मे आणि 1 जून रोजी पार पडला. या लिलावात 10 खेळाडूंना 1 कोटीहून अधिकची बोली लागल्याने नवा विक्रम नोंदवला गेला.प्रो कबड्डीr लीग सीझन 12 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि हॉटस्टार होणार आहे.