महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रियांका करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

06:27 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात झळकणार

Advertisement

प्रियांका चोप्रा अलिकडेच भारतात दाखल झाली होती. तिने भारत दौऱ्यादरम्यान अयोध्येतील राम मंदिरात जात दर्शनही घेतले आहे. याचबरोबर तिने अनेक पटकथा जाणून घेत बॉलिवूडमध्ये पुनरागमनाची तयारी चालविली आहे. प्रियांका आता संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

प्रियांकाने स्वत:च्या दौऱ्यात अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी गाठीभेटी केल्या आहेत. तसेच ती स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसच्या कामावर लक्ष देऊ इच्छित आहे. स्वत:च्या बॅनरसाठी 3-4 प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रीत करत तिने अनेकांशी चर्चा केली आहे.

प्रियांकाच्या आगामी हिंदी चित्रपटाविषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. याकरता अनेक पटकथांचे वाचन करत आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे. एका अॅक्शन प्रोजेक्टसाठी प्रियांकाने संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली होती. हा चित्रपट एका वेगळ्या काळातील कथा दर्शविणारा आहे.

प्रियांका चोप्रा अलिकडेच अमेझॉन प्राइमच्या एका सोहळ्यात दिसून आली होती. यात तिने स्वत:चा पुढील प्रोजेक्ट ‘वुमन ऑफ माय बिलियन’ची घोषणा केली आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर दिसून येणाऱ्या या माहितीपटात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक महिलांच्या कहाण्या असणार आहेत. अपूर्वा बख्शी आणि चोप्रा-जोनस मिळून याची निर्मिती करणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article