For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियांकाकडून धक्कादायक विजयाची नोंद

06:45 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रियांकाकडून धक्कादायक विजयाची नोंद
Advertisement

वृत्तसंस्था/ बटुमी, जॉर्जिया

Advertisement

महिला इंटरनॅशनल मास्टर के. प्रियांकाने येथे सुरू असलेल्या फिडे वर्ल्ड वुमन चेस कपच्या पहिल्या फेरीत ब्लिट्झ गेम्समध्ये हंगेरीच्या वरच्या क्रमांकावर विसावलेल्या झोका गालच्या बचावफळीला भेदून पहिल्या फेरीच्या टायब्रेकरमध्ये मोठा धक्का नोंदविला.

प्रियांकासाठी पुढील प्रवास अधिक कठीण आहे, परंतु तिने हे सिद्ध केले आहे की, सर्वोत्तम खेळाडूंविऊद्ध उत्तम कामगिरी करणाऱ्या पुऊष खेळाडूंचे पराक्रम देशातील तऊण महिला खेळाडूंना प्रेरणा देत आहेत. क्लासिकल टाईम कंट्रोलखाली पहिला गेम गमावल्यानंतर प्रियांकाने गालच्या आव्हानाला चिरडून सामना टायब्रेकरमध्ये नेताना धैर्याने पुनरागमन केले. त्यानंतर भारतीय खेळाडूने रॅपिड टायब्रेक गेममध्ये एक लढत गमावली आणि एका सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या काही ब्लिट्झ गेम्समध्ये मात्र भारतीय खेळाडूला रोखता आले नाही. कारण तिने सलग दोन गेम्स जिंकून या नॉकआउट स्पर्धेत 64 खेळाडूंच्या फेरीत प्रवेश केला.

Advertisement

या स्पर्धेत दुसऱ्या फेरीपासून अनेक प्रतिष्ठित खेळाडू सहभागी होतील. नऊ भारतीय महिला स्पर्धेत आहेत, त्यापैकी कोनेरू हम्पी, डी. हरिका, आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांना दुसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. उर्वरित पाचपैकी फक्त किरण मनीषा मोहंती मायदेशी परतेल, तर इतर चार खेळाडू म्हणजे वंतिका अग्रवाल, पद्मिनी राऊत, पी. व्ही. नंदीधा आणि प्रियांका या सर्व 64 खेळाडूंच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत.

चौथ्या क्रमांकावर असलेली कोनेरू हम्पी दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या अफऊझा खामदामोवाविऊद्ध खेळताना दिसेल. या नॉकआउट स्पर्धेत ती अंतिम 32 खेळाडूंच्या टप्प्यात सहज स्थान मिळविण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, हरिका आणि नंदीधा या भारतीय खेळाडूंमध्ये लढत रंगणार असून त्यात हरिकाचे पारडे जड राहील. प्रियांका तिच्या शानदार विजयानंतर पोलंडच्या कुलोन क्लॉडियाशी भिडेल, तर पद्मिनी राऊतला माजी महिला विश्वविजेती अलेक्झांड्रा कोस्टेनियुकच्या रुपाने कठीण प्रतिस्पर्धी मिळालेला आहे. अलेक्झांड्रा आता स्वित्झर्लंडचे प्रतिनिधीत्व करते.

Advertisement
Tags :

.