For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द ब्लफ’मध्ये प्रियांका चोप्रा

06:23 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘द ब्लफ’मध्ये प्रियांका चोप्रा
Advertisement

हॉलिवूडमधील अभिनेत्री बहरती कारकीर्द

Advertisement

प्रियांका चोप्राला हॉलिवूडमध्ये आता स्वत:चे स्थान निर्माण करता आले आहे. बर्फी, डॉन, मेरी कॉम, बाजीराम मस्तानी यासारखे हिंदी चित्रपट केल्यावर प्रियांका आता हॉलिवूडमध्ये स्वत:च्या अभिनयाची जादू दाखवून देत आहे. प्रियांकाने 2017 मध्ये ‘बेवॉच’ चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हापासून ती सातत्याने मोठमोठे चित्रपट आणि सीरिजमध्ये दिसून येत आहे. मागील वर्षी ती रुसो ब्रदर्सची वेबसीरिज ‘सिटाडेल’ आणि ‘लव्ह अगेन’मध्ये दिसून आली होती. प्रियांकाने काही दिवसांपूर्वी हेड्स ऑफ स्टेट या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहेत. आता अभिनेत्री आगामी चित्रपट ‘द ब्लफ’च्या तयारीत सामील झाली आहे. अभिनेत्रीने नवा प्रोजेक्ट देवाचे स्मरण करत सुरू केला आहे. प्रियांकाने द ब्लफच्या रीडिंग सेशनची झलक दाखवून दिली आहे. एका छायाचित्रासोबत प्रियांकाने ‘याची सुरुवात झाली आहे’ असे नमूद केले आहे.  द ब्लफ या चित्रपटाचे चित्रिकरण ऑस्ट्रेलियात होणार आहे. काही काळापूर्वीच प्रियांका स्वत:च्या मुलीसोबत ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली होती. द ब्लफ या चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रँक ई. फ्लॉवर्स करणार आहे. यात तिच्यासोबत कार्ल अर्बन हा अभिनेता दिसून येईल. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Advertisement

.