मॅरेथॉनमध्ये प्रिया-हुसेन प्रथम
वार्ताहर /किणये
सांस्कृतिक कला व क्रीडा मंच यांच्यावतीने खास दीपावली निमित्त मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलींच्या गटात संकेश्वरची प्रिया पाटीलने तर मुलांच्या गटात खानापूरच्या हुसेन सेनापतीने विजेतेपद मिळविले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बसवाणी मोटणकर,सुधीरनायक नंदी, सुजाता कर्लेकर, परशराम शहापूरकर आदी उपस्थित होते. विविध मान्यवरांच्या हस्ते विविध देवतांचे पूजन करून दीप पूजन करण्यात आले.
स्पर्धाचा निकाल पुढील प्रमाणे
मुलींच्या गटात नकुशा मंगनाकर द्वितीय, साक्षी अजरेकर तृतीय,नम्रता सुतार चौथा, नुरजा मुजावर पाचवा तर मुलांच्या गटात आनंद गावकर द्वितीय, भैरू नाईक तृतीय, प्रथमेश परमकर चौथा, सुनील दंडाई पाचवा यांनी क्रमांक मिळविला. लहान मुलांच्या गटामध्ये सोहम आजरेकर प्रथम, वेदांत पाटील द्वितीय, हनमंत पाटील तृतीय, राधाकृष्ण भिसे चौथा, आर्यन पाटीलने पाचवा क्रमांक मिळविला.