एक्स्ट्रिम सेक्युरिटीतर्फे खासगी सुरक्षा दिन
बेळगाव : 4 डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशभर खासगी सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाही एक्स्ट्रिम सेक्युरिटी कंपनीने हा दिवस कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत केक कापून साजरा केला. यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर इंद्रजित प्रधान यांनी खासगी सुरक्षा दिनाचे महत्त्व आणि त्यामागचे कारण याबद्दलची माहिती दिली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून अभिनंदन केले. कंपनीचे सीईओ संदीप अष्टेकर व सीईओ मनीषा अनगोळकर यांनी कंपनीची उद्दिष्टे सांगून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. खासगी सुरक्षा रक्षक हे एक महत्त्वाचे घटक आहे.
ते समाजात राहून सुरक्षितता सुनिश्चित करतात. एक्स्ट्रिमच्या प्रशिक्षण केंद्राद्वारे कंपनीचे प्रशिक्षण अधिकारी यशवंत पाटील आणि मारुती पाटील हे आधुनिक काळामध्ये जसे की सीसीटीव्ही, टीव्ही कॅमेरे, अलार्म सिस्टिम यांचा वापर करून सुरक्षा मजबूत करण्याचे तसेच फायर इक्ंिस्टगुईशर हाताळण्याचे, प्राथमिक उपचाराबद्दल आपत्कालिन परिस्थितीमधील प्रसंगावधान आणि घेण्याची खबरदारी, सीपीआर,मॉक ड्रील इत्यादींचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे कंपनीमध्ये जाऊन प्रशिक्षण देतात. सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांना समाजाने कधीही दुर्लक्ष न करता त्यांचा सन्मान करावा आणि त्यांच्या कार्याची दखल घ्यावी, असे धोरण एक्स्ट्रिम कंपनीचे आहे.