कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुरळमध्ये खासगी आराम बस-डंपरची धडक

01:18 PM May 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

संगमेश्वर :

Advertisement

मुंबई-गोवा राष्ट्रीय महमार्गावर तुरळ येथे खासगी आराम बस आणि डंपरची धडक बसल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. महामार्गावर रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान वाहनांच्या रांगा ५ किलोमीटरपर्यंत लागल्याने वाहतूक कोंडी झाली.

Advertisement

गणपतीपुळे येथून कोपरखैरणेकडे निघालेल्या आराम बसची तुरळ फाटा येथे डंपरला मागून धडक बसल्याने बसचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. कडवईत जाणारा डंपर (एमएच १२ डब्ल्यू जे ४७५१) तुरळ फाटा येथून वळत असताना मागून आलेली ट्रॅव्हल बस (एमएच ४३ सीइ ४२९३) धडकल्याने बसचे मोठे नुकसान झाले. यात चालकासह बसमधील काही प्रवासी जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात झाल्यानंतर डंपर चालक पसार झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

महामार्गावर ठेकेदार कंपनीकडून उपाययोजना होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. ठेकेदार कंपनी प्रवासी तसेच रस्त्यांची कामे करत असताना कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करीत नाही. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष थेराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article