For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी कंपन्यांना भांडवली गुंतवणूक, सरकारी प्रोत्साहनामुळे आले बळ

07:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
खासगी कंपन्यांना भांडवली गुंतवणूक  सरकारी प्रोत्साहनामुळे आले बळ
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

रिझर्व्ह बँकेने अलीकडच्या काही महिन्यात खासगी क्षेत्राच्या भांडवलात दुहेरी अंकी वाढ दर्शविल्यानंतर भारतीय कंपन्या त्यांच्या भांडवली खर्चाच्या योजनांना गती देत आहेत. सरकारी प्रोत्साहन आणि वाढत्या मागणीमुळे प्रोत्साहित होऊन कंपन्या त्यांची क्षमता वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. आरबीआयने गेल्या आठवड्यात चलनविषयक धोरणात म्हटले होते की क्षमता वापरात वाढ आणि भावना सुधारण्याबरोबरच बँक आणि कंपन्यांच्या मजबूत ताळेबंदामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणूक सतत वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. पुढील काही वर्षांमध्ये मोठी भांडवली गुंतवणूक होईल, असे भारतीय उद्योग क्षेत्रातील नेत्यांचे म्हणणे आहे. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टीलचे सीएफओ अमित हरलालका म्हणाले, ‘एकंदरीत विस्तारासाठी आम्हाला 4.5 ते 5 अब्ज डॉलर गुंतवणुकीची गरज आहे. त्यामुळे या वर्षीच 2 ते 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार असून 2025 पर्यंत 2 ते 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष आर दिनेश म्हणाले की एकूण भांडवली खर्चात खासगी क्षेत्राचा वाटा 36 ते 37 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्येही ही भागीदारी अबाधित राहील. टाटा, रिलायन्स, अदानी आणि जिंदाल समूहांनी नवीन ऊर्जा आणि वीज निर्मितीसह विविध क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे खाजगी गुंतवणुकीला गती मिळाली आहे. त्याचप्रमाणे मारुती सुझुकी आणि ह्युंडाई यांच्या नेतृत्वाखालील ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतात क्षमता विस्तारासाठी मोठ्या गुंतवणुकीची योजना आखली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.