For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रीतिस्मिता भोईचा युवा वेटलिफ्टिंगमध्ये नवा विश्वविक्रम

06:33 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रीतिस्मिता भोईचा युवा वेटलिफ्टिंगमध्ये नवा विश्वविक्रम
Advertisement

वृत्तसंस्था/ मनामा, बहरिन

Advertisement

भारताच्या प्रीतिस्मिता भोईने युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या 44 किलो वजन गटात क्लीन व जर्कमध्ये तिने हा नवा विक्रम केला.

16 वर्षीय भोईने क्लीन व जर्कमध्ये 92 किलो वजन उचलत युवा विश्वविक्रम नोंदवला. स्नॅचमध्ये तिने 66 किलोसह एकूण 158 किलो वजन उचलत पहिले स्थान पटकावले. मुलांच्या 60 किलो वजन गटातही भारताने रौप्यपदक मिळविले. क्लीन व जर्कमध्ये भोईने पहिल्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 3 किलो जास्ती वजन उचलले आणि शेवटच्या प्रयत्नात तिने 92 किलो वजन उचलत नवा युवा विश्वविक्रम नोंदवला.

Advertisement

17 वर्षीय वेटलिफ्टर महाराजन अरुमुगापंडियनने मुलांच्या 60 किलो गटात रौप्य मिळविले. त्याने स्नॅचमध्ये 114 व क्लीन-जर्कमध्ये 142 असे एकूण 256 किलो वजन उचलले. चीनच्या चेन झुन्फाने एकूण 261 किलो वजन उचलत या गटात सुवर्ण पटकावले. भारताची एकूण पदकसंख्या आता 23 झाली असून त्यात 3 सुवणं, 9 रौप्य व 11 कांस्यपदकांचा समावेश आहे. शनिवारी भारताची पदकसंख्या 17 होती, त्यात 2 सुवर्ण, 6 रौप्य व 9 कांस्यपदके होती.

Advertisement
Tags :

.