पृथ्वीराज मगदूम कुमार महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला
वारणा कापशी वार्ताहर
साळशी तालुका शाहूवाडी येथील पृथ्वीराज राजाराम मगदूम यांनी पुणे येथे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये कुमार महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे .17 वर्षाखालील खुल्या गटामध्ये ग्रीको रोमन प्रकारात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत त्याने मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राच्या धीरज कारंडेवर दहा गुणांनी मात केली.
पृथ्वीराज मगदूम 17 वर्षाखालील पार पडलेल्या ग्रीको रोमन कुस्ती प्रकारांमधील कुमार महाराष्ट्र केसरी पदाचा पहिलाच मानकरी ठरला आहे .त्याला चांदीची गदा व एक लाख रुपये किमतीची टूव्हीलर गाडी देखील मिळाली आहे .त्याला महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे ,उपाध्यक्ष मंगेश गोंधळेकर ,आमदार भीमराव तापकीर ,आमदार रवींद्र धंगेकर ,अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या हस्ते चांदीची गदा व टू व्हीलर गाडी देऊन देऊन गौरव करण्यात आला. पृथ्वीराज मगदूम बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट कुस्ती केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहे त्याला रणजीत महाडिक, शिवाजी पाटील ,रामचंद्र साळुंखे, एस .के मगदूम, सर्जेराव मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. शाहूवाडी तालुक्याला कुमार महाराष्ट्र केसरी चा पृथ्वीराज मगदूम यांच्या रूपाने पहिलाच मान मिळाला असल्याकारणाने शाहुवाडी तालुक्यातील कुस्ती शौकिनांच्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.