महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा कारागृहात कैद्याचा वॉर्डरवर हल्ला

11:25 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंधार कोठडीतील प्रकाराने धास्ती

Advertisement

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील वॉर्डरवर एका कैद्याने हल्ला केला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून जखमी वॉर्डरला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुंडा कायद्याखाली स्थानबद्धतेत असलेल्या कैद्याने हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. विनोद लोकापूर (वय 27) असे जखमी वॉर्डरचे नाव आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील अतिसुरक्षित अशा अंधार कोठडीत घडलेल्या या घटनेने अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊ लागले तर कारागृहात काम कसे करायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गुंडा कायद्याखाली स्थानबद्धतेत असलेल्या राहिल पाशा ऊर्फ राहुल याने हा हल्ला केला असून त्याच्यावर भादंवि 323, 324, 353, 504 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नचिकेत जनगौडा व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. उपलब्ध माहितीनुसार रविवारी सायंकाळी अंधार कोठडीत सेवेत असताना कारागृहातील इस्पितळाला जाण्यावरून ही घटना घडली आहे. राहिल पाशाला इस्पितळाला जायचे होते. त्याने आपल्यासोबत एक कर्मचारी पाठवा, अशी मागणी केली. कर्मचारी पाठवण्यास विलंब झाल्यामुळे शिवीगाळ करीत वॉर्डरच्या हातातील काठी घेऊन त्यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच इतर अधिकारी अंधार कोठडी विभागात दाखल झाले. जखमी वॉर्डरला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. सोमवारी सायंकाळी यासंबंधी एफआयआर दाखल केला आहे. वॉर्डरवरील हल्ल्यामुळे हिंडलगा  कारागृह ठळक चर्चेत आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article