महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विजयी झाल्यास महिला सबलीकरणाला प्राधान्य

10:55 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रियांका जारकीहोळी : कलखांब, मुचंडी, अष्टेत महिला मेळावा

Advertisement

बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यास स्वसाहाय्य संघ अधिक बळकट केले जातील. महिलांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविल्या जातील. महिला सबलीकरणासाठी प्राधान्य दिले जाईल, असे चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील कलखांब, मुचंडी, अष्टे या गावांमध्ये बुथस्तरावरील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. आपले वडील मंत्री सतीश जारकीहोळी यांचा या मतदार संघातील मतदारांवर मोठा विश्वास आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. बहुमताने निवडून आणण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या मतदार संघातून आपण निवडून आल्यास महिला सबलीकरणाला प्राधान्य देणार आहोत. या बरोबरच या भागाच्या विकासालाही महत्त्व दिले जाईल. निवडणुकीमध्ये निवडून देण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. मतदारांनी आशीर्वाद द्यावा. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना या मतदार संघातील मतदारांनी विश्वास ठेवून निवडून दिले आहे. त्या प्रमाणेच आपल्यावरही मतदारांनी विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी, मजूर, गरीब, मध्यमवर्गीय, सर्व समाजातील सर्व नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल. काँग्रेसच्या कार्यकाळात अनेक विकास कामे झाली आहेत. कृषी क्षेत्राला मोठे योगदान देण्यात आले आहे. देशाचे भविष्य तरुणांच्या हाती असून तरुणांनीही काँग्रेस पक्षाला मत देऊन निवडून द्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अरविंद कार्ची, जयश्री माळगी, मनोहर हुक्केरीकर, शिवाजी पाटील, कमलाप्पा अष्टगी, बसवाणी नायक, पिंटू नायक, मंजुनाथ कोलकार आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article