For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रेम प्रकरणातून दोघा भावांचा खून

11:10 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रेम प्रकरणातून दोघा भावांचा खून
Advertisement

मुलीला सतावल्यामुळे बापाकडून चाकूहल्ला : सौंदत्ती तालुक्यात कारीमनीजवळ घटना

Advertisement

बेळगाव : अल्पवयीन मुलीच्या मागे लागलेला एक तरुण व त्याच्या भावाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री सौंदत्ती तालुक्यातील कारीमनीजवळ ही घटना घडली असून त्या मुलीच्या वडिलांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. मायाप्पा हळेगोडी (वय 20) व त्याचा भाऊ यल्लाप्पा हळेगोडी (वय 22) दोघेही राहणार कारीमनी, ता. सौंदत्ती अशी खून झालेल्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. फकिराप्पा बावीहाळ (वय 50), रा. दुंडनकोप्प याने या दोन्ही भावंडांचा चाकूने भोसकून खून केल्याचे उघडकीस आले आहे. मुरगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मंगळवारी लोकसभेसाठी मतदान झाले. सायंकाळी मतदानानंतर पोलीस व सरकारी यंत्रणा मतयंत्रे स्ट्राँगरूमला पाठविण्याच्या घाईत असतानाच सोगल रोडवरील कारीमनीजवळ दुहेरी हत्या झाल्याची बातमी येऊन थडकली. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक पांडुरंगय्या एम., मुरगोडचे पोलीस निरीक्षक आय. एम. मठपती आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रेमाचा सोडला नव्हता तगादा

Advertisement

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या घटनेसंबंधी माहिती दिली आहे. पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून फकिराप्पाला ताब्यात घेतले आहे. फकिराप्पाच्या मुलीवर खून झालेल्या मायाप्पाचे प्रेम जडले होते. ती अल्पवयीन असूनही त्याने तिचा पाठलाग सुरू केला होता. फकिराप्पाने अनेकवेळा त्याला समज देऊनही मायाप्पाने प्रेमाचा तगादा सोडला नव्हता.

Advertisement
Tags :

.