कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधानांचा रशिया दौरा लांबणीवर

06:22 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

9 मे रोजीच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार नाहीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला रशिया दौरा पुढे ढकलल्याचे समजते. पंतप्रधान मोदींना रशियाने 9 मे रोजी होणाऱ्या विजय दिन परेडसाठी आमंत्रित केले होते. मात्र, सद्यस्थितीत ते मॉस्को येथे होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याची शक्यता फारच कमी आहे.  तथापि, स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार 9 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पंतप्रधान मोदींची जागा घेऊ शकतात.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नरेंद्र मोदींव्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना विजय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी आणि रेड स्क्वेअरवरील विजय परेड पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. शी जिनपिंग यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची पुष्टी केली आहे. मॉस्कोमध्ये सुमारे 20 परदेशी नेत्यांचे स्वागत करण्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

Advertisement
Next Article