महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधानांच्या गोवा दौऱ्याने ‘दक्षिणायन’ची नांदी

06:34 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदी यांची सभा गोव्यात झाली असली तरी गोव्याला लागून असलेल्या दक्षिणेतील प्रांताचे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी करत विकसित भारत, विकसित गोवा यादिशेने पावले टाकली असल्याचे स्पष्ट केले आहे. या गोव्यातील सभेच्या निमित्ताने वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणुकीचे नियोजन करताना भाजपच्या नकाशावर येऊ न शकलेल्या 180 मतदारसंघांकडे पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Advertisement

 

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या गोवा भेटीचे प्रयोजन शासकीय असले तरी त्यातून लोकसभा निवडणुकीचे नियोजनही ठळकपणे दिसून आले. कुंकळ्ळी येथील एनआयटी प्रकल्प, दोनापावला येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र व काकोडा येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन तसेच पणजी ते रेईश मागूश किल्ल्यादरम्यान महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्प आणि शेळपे साळावली येथे 100 एमएलडी पाणी प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. ‘विकसित भारत विकसित गोवा 2047’ यानिमित्त भर दुपारी दक्षिण गोव्यात मडगाव शहरात हजारोंच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी यांची सभा होणे हा काही योगायोग म्हणता येणार नाही.

राज्याला पथदर्शक व गतिमान विकासाची गॅरेंटी देताना शिक्षण व पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीची योजनाही त्यांनी जाहीर केली. त्यामागील लोकसभा निवडणुकीची गुंतवणूक लपली नाही. विकासाची मोदी गॅरेंटी देताना त्यांनी निव्वळ आश्वासनांची खैरात न करता प्रकल्पांच्या लोकापर्णाची हमीही दिली. आपल्या संपूर्ण भाषणात विरोधकांना कुठेच लक्ष्य न करता, विकासाचा मॉडेल गोमंतकीयांपुढे त्यांनी ठेवला. धार्मिक सलोखा ही जगभर गोव्याची ओळख आहे. हा मुद्दा अचूक पकडून त्याला सर्वधर्मसमभावाची जोड देत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे श्रेय त्यांनी गोव्याला दिले. त्यासाठी येथील हिंदू परंपरेतील संतापासून ख्रिस्ती धर्मियांच्या संत-महंतांचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. तूर्त या सभेतून गोमंतकीय मतदारांना त्यांनी आश्वासक तर केलेच शिवाय भाजप कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या कामाला जोमाने सुऊवात करण्याची ऊर्जाही निर्माण केली आहे.

पंतप्रधान मोदी यांची ही सभा गोव्यात झाली असली तरी गोव्याला लागून असलेल्या दक्षिणेतील प्रांताचे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणुकीचे नियोजन करताना भाजपच्या नकाशावर येऊ न शकलेल्या 180 मतदारसंघाकडे पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. देशाच्या इशान्येकडील राज्यात पक्ष विस्तार व सत्ता स्थापनेकडे यशस्वी कूच करताना दक्षिण भारतातील राज्यांकडे  भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी या बिगरभाजप मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी दक्षिण गोव्यात दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसोबत सभा, बैठका घेऊन अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर केला होता. त्यातून भाजपला नेमके काय अपेक्षित आहे, हे स्पष्ट होते. संख्यात्मकदृष्ट्या विचार केल्यास गोव्यात केवळ दोनच लोकसभा मतदारसंघ आहेत. जागा दोन असल्या तरी त्या शंभर टक्के जिंकून एक संपूर्ण राज्य भाजपच्या खात्यात जमा करणे, हा राजकीय व्यवहार भाजपलाच समजू शकतो. त्यामुळे दक्षिणेची जागा जिंकण्यासाठी पंतप्रधानांची ही सभा म्हणजे जोरदार पूर्वतयारी मानल्यास हरकत नाही.

भाजपसाठी दक्षिण गोवा मतदारसंघ काबिज करणे नेहमीच आव्हानात्मक ठरले आहे. आजवरच्या इतिहासात केवळ दोनवेळा भाजपचे खासदार दक्षिणेतून विजयी झाले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात रमाकांत आंगले यांनी पहिल्यांदा खाते उघडले व त्यानंतर 2014च्या मोदी लाटेत अॅड. नरेंद्र सावईकर यांनी दुसऱ्यांदा दक्षिण गोवा पादाक्रांत केला. ख्रिस्तीबहुल प्रदेश असलेला हा मतदारसंघ आजवर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला आहे. अॅड. नरेंद्र सावईकर हेच दक्षिणेचे प्रमुख दावेदार आहेत. माजी उपमुख्यमंत्री व ज्यांच्या नेतृत्वाखाली 2017च्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुतेक काँग्रेस भाजपात विलीन झाली, ते बाबू कवळेकर तसेच  माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची नावेही चर्चेत आहेत. तूर्त भाजपने आपला संभाव्य उमेदवार जाहीर केलेला नसला तरी ही जागा जिंकण्यासाठी प्रभावी रणनीती आखली आहे, हे निश्चित. खाण बंदी, डबल ट्रॅक व कोळसा वाहतुकीला होणारा विरोध या काही मुद्यांवर दक्षिण गोवा कायम चर्चेत राहिला आहे. शिवाय दुहेरी पासपोर्ट हा येथील ख्रिस्ती मतदारांसाठी अडचणीचा ठरणारा मुद्दा विरोधकांसाठी मोदी गॅरेंटीला आव्हान देणारे भांडवल ठरू शकतो. काही दिवसांपूर्वी गोव्यात झालेल्या ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीनंतर विरोधकांमध्ये विशेष उत्साह दिसला नाही. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या मगो पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर आपल्या सर्व समित्या बरखास्त करून भाजपला पूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स या प्रादेशिक पक्षाने स्वतंत्ररित्या निवडणूक लढविण्याची भूमिका काँग्रेसला अडचणीची  ठरू शकते. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना ‘अब की बार चारसौ पार’ ही पंतप्रधान मोदी यांची घोषणा आहे. हा चारशेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने आता दक्षिण भारतात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची रणनीती आखलेली दिसते.

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article