महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत : राहुल गांधी

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधानांच्या जातीचा काँग्रेस नेत्याकडून उल्लेख

Advertisement

वृत्तसंस्था /भुवनेश्वर

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जातीवरून वादग्रस्त दावा केला आहे. ओडिशात भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी जातीत जन्मले नव्हते तर सामान्य जातींमध्ये जन्मले होते, असा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी हे ओबीसी म्हणून जन्मल्याचे सांगून भाजप लोकांना मूर्ख करत असल्याचे राहुल यांनी गुरुवारी म्हटले आहे. भाजपने 2000 साली संबंधित जातसमुदायाला ओबीसीचा दर्जा दिला होता. प्रत्यक्षात त्यापूर्वी मोदी हे ओबीसी नव्हते. ओबीसी म्हणून जन्माला आल्याचे सांगून मोदी हे दिशाभूल करत असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. यापूर्वी संसदेत बोलताना नरेंद्र मोदींनी आपण ओबीसी असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच मागास जातींसोबत काँग्रेसने अन्यायपूर्ण वर्तणूक केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता.  मोदी हे ओबीसी नाहीत, कारण ते कुठल्याही ओबीसीची गळाभेट घेत नाहीत. मोदी कधीच जातनिहाय सर्वेक्षण करविणार नाहीत, कारण ते ओबीसीच नाहीत. कोट्यावधींचा सूट परिधान करून ते स्वत:ला गरीब आणि फकीर म्हणवून घेतात. सकाळी नवा ड्रेस, संध्याकाळी नवा ड्रेस आणि रोज नवनवे ड्रेस परिधान करतात आणि स्वत:ला ओबीसी म्हणवून घेतात असे वक्तव्य राहुल यांनी केले आहे. मोदी हे ओबीसीची गळाभेट घेत नाहीत, याचमुळे मला त्यांच्या जन्म प्रमाणपत्राची गरज नाही. ते कधीच एखादा शेतकरी किंवा मजुराचा हात पकडत नाहीत, ते केवळ अदानीचा हात पकडतात, याचमुळे ते पूर्ण जीवनात जातनिहाय सर्वेक्षण करवू देणार नाहीत. जातनिहाय सर्वेक्षणाचे काम काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधीच करवून दाखविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article