For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एक्स’वर पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम

06:45 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एक्स’वर पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम
Advertisement

10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले नेते ठरले : अन्य राजकीय नेते खूपच मागे

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर नवा विक्रम केला आहे. त्यांनी स्वत:च्या एक्स अकौंटवर 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा ओलांडला आहे. अशाप्रकारची कामगिरी करणारे ते जगातील पहिले नेते ठरले आहेत. अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील मोदींचे मोठ्या संख्येत फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर फॉलोइंग प्रकरणी अन्य नेते मोदींपेक्षा खूपच पिछाडीवर आहेत.

Advertisement

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे एक्सवर 2.64 कोटी फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 2.75 कोटी फॉलोअर्स तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे 1.99 कोटी फॉलोअर्स आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे 74 लाख फॉलोअर्स आहेत. लालू प्रसाद यादव यांना एक्सवर 63 लाख लोक फॉलो करतात.

फॉलोइंग प्रकरणी नरेंद्र मोदी हे भारतीय नेत्यांपेक्षा खूपच पुढे आहेत, तसेच विदेशी नेत्यांमध्ये देखील मोदींना आव्हान देणारा कुणीच नाही. अमेरिकचे अध्यक्ष जो बिडेन यांचे एक्सवर 3.81 कोटी फॉलोअर्स आहेत. मागील तीन वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींच्या एक्स हँडलवर जवळपास 3 कोटी फॉलोअर्सची मोठी भर पडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर देखील चांगल्या संख्येत लोक फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर मोदींचे 9.12 कोटी, फेसबुकवर 4.9 कोटी आणि युट्यूबवर 2.49 कोटी फॉलोअर्स आहेत. तर व्हॉट्सअॅप चॅनेलवरही त्यांना 1.30 कोटी लोक फॉलो करतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म    फॉलोअर्स

एक्स (ट्विटर)                 10 कोटी

इन्स्टाग्राम              9.12 कोटी

युट्यूब                        2.49 कोटी

फेसबुक                      4.9 कोटी

व्हॉट्सअॅप               1.30 कोटी

यादीत मस्क अग्रस्थानी

पंतप्रधान मोदींनी फॉलोअर्स प्रकरणी आता अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्टलाही मागे टाकले आहे. स्विफ्टचे एक्सवर 9.53 कोटी फॉलोअर्स आहेत. प्रसिद्ध खेळाडूंपेक्षाही मोदींचे अधिक फॉलोअर्स आहेत. क्रिकेटपटू विराट कोहलीला 6.41 कोटी लोक फॉलो करतात. तर ब्राझिलियन फुटबॉलपटू नेमार ज्युनियरला 6.36 कोटी लोक फॉलो करतात. अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्सचे एक्सवर 5.29 कोटी फॉलोअर्स आहेत. लेडी गागाचे एक्सवर 8.31 कोटी आणि किम कार्दशियनचे 7.52 कोटी फॉलोअर्स एक्सवर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींची व्यापक लोकप्रियता आणि स्वत:च्या समर्थकांसोबत त्यांची सक्रीय भागीदारी पाहता ही कामगिरी आश्चर्याची गोष्ट नाही. एक्सवर फॉलोअर्सप्रकरणी एलन मस्क अग्रस्थानी आहेत, त्यांचे 18.7 कोटी फॉलोअर्स आहेत. मस्क यांच्याकडेच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी आहे.

Advertisement
Tags :

.