For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिसेंबरमध्ये भाजपला नवा अध्यक्ष मिळणार

06:53 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
डिसेंबरमध्ये भाजपला नवा अध्यक्ष मिळणार
Advertisement

ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार : नोव्हेंबरमध्ये स्थानिक-जिल्हा पातळीवर निवडणूक

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

वर्षअखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये भाजप आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे. 1 ऑगस्टपासून या पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीपूर्वी व्यापक सदस्यत्व मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा आणि राज्य घटकांच्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान मंडल (स्थानिक युनिट) अध्यक्षांसाठी निवडणूक होणार आहे. यानंतर 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Advertisement

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांचा कार्यकाळ यावषी जानेवारीत संपला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना आरोग्यमंत्री करण्यात आल्यामुळे भाजप आता नव्या अध्यक्षाच्या शोधात आहे. त्यानुसार यावषी डिसेंबरपर्यंत भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल.

1 ऑगस्टपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रियेला सुऊवात होणार आहे. यासाठी सर्वप्रथम सदस्यत्व मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम 15 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत सक्रिय सदस्यत्व मोहीम राबविण्यात येणार आहे. सक्रिय सदस्यत्व मोहिमेची पडताळणी 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत केली जाईल. तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यात मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतरच प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. भाजप मंडल अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ध्याअधिक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यावरच राष्ट्रीय अध्यक्षांची अधिकृतपणे निवड केली जाईल.

Advertisement
Tags :

.