महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी युक्रेनचा दौरा करणार ?

06:39 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या वृत्ताला महत्व, दोन्ही देशांकडून सकारात्मक संकेत

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात युव्रेनचा दौरा करण्याची शक्यता आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होत आहे. दोन वर्षांहून अधिक काळ दोन्ही देश युद्धमान स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संभाव्य दौऱ्याला महत्व दिले जात आहे. भारत आणि युक्रेन या दोन्ही देशांनी या संभाव्य दौऱ्यासंदर्भात सकारात्मक संकेत दिले असल्याचे दिसून येते.

रशिया आणि युक्रेन यांच्यात प्रदीर्घ काळ होत असलेले युद्ध थांबावे, यासाठी विश्वसमुदाय प्रयत्नशील आहे. युरोपियन देशांपैकी काही देशांनी असे प्रयत्न आता पुन्हा गतीमान केले आहेत. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

राष्ट्रीय दिनप्रसंगी दौरा शक्य

24 ऑगस्ट हा युव्रेनचा राष्ट्रीय दिन आहे. त्याच दिवशी हा दौरा केला जाऊ शकतो. युव्रेनचा हा दौरा एक दिवसाचाच असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या महिन्यात युव्रेनचे नेते व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची इटलीमध्ये आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचाही दौरा केला होता.

अधिकृत दुजोरा अद्याप नाही

या दौऱ्यासंबंधी अद्याप भारत किंवा युक्रेन यांच्यापैकी कोणत्याही देशाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तसेच दौऱ्याचा कार्यक्रमाची निश्चित रुपरेषा निर्धारित करण्यात आलेली नाही. या संभाव्य दौऱ्याची माहिती सध्यातरी संबंधित सूत्रांनीही प्रसारित केली आहे. तरीही दोन्ही देश या दौऱ्यासाठी सकारात्मक भूमिकेत दिसून येतात असे जाणकारांचे मत आहे. भारताचे रशियाशी असणारे घनिष्ट संबंध पाहता भारताला या दौऱ्याचा विचार सर्व शक्यता लक्षात घेऊनच करावा लागेल, असेही अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.

आंतरराष्ट्रीय समतोलाचा प्रश्न

अमेरिका आणि रशिया यांच्यात युक्रेन मुद्द्यावरुन मोठे मतभेद आहेत. तरीही भारताने दोन्ही देशांशी मैत्रीचे संबंध राखण्यात आतापर्यंत यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ते 9 जुलै या काळात रशियाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी जर युक्रेनचा दौरा केला, तर रशिया नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संभाव्य दौरा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर त्यापूर्वी भारताला या दौऱ्याचे परिणाम कोणते आणि कसे होतील, यासंबंधी बराच विचार करावा लागेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

भारताकडून मध्यस्थीची अपेक्षा

रशिया आणि युव्रेन यांच्यात होत असलेल्या युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा जगभर करणाऱ्या साखळ्या तुटल्या आहेत. जगभर असणाऱ्या महागाईच्या वाढत्या संकटासाठीही हे युद्ध कारणीभूत आहे, असे मानले जात आहे. परिणामी, हे युद्ध लवकरात लवकर थांबणे जगाच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे. भारत रशियाचा जवळचा मित्र असल्याने भारताने रशियाला हे युद्ध थांबविण्याचे महत्व पटवून द्यावे, अशी अनेक पाश्चिमात्य देशांची अपेक्षा आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

संभाव्य दौऱ्यासंबंधी मोठी चर्चा

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य युक्रेन दौऱ्याची चर्चा व्यापक प्रमाणात

ड आंतरराष्ट्रीय राजकारणाचा समतोल बिघडू न देता भारताचा निर्णय होणार

ड 24 ऑगस्टच्या युव्रेन राष्ट्रीय दिवसाच्या निमित्ताने दौऱ्याचे आयोजन शक्य

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात इटलीमध्ये झाली होती चर्चा

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article