महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी सोमवारपासून रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यावर

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन दिवसांचा विदेश दौरा : परराष्ट्र मंत्रालयाकडून रुपरेषा जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 10 जुलै दरम्यान रशिया आणि ऑस्ट्रिया रिपब्लिकचा दौरा करणार आहेत. रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान 8 ते 9 जुलैदरम्यान हा विदेश दौरा करत आहेत. ते सोमवार, 8 जुलै रोजी मॉस्को येथे पोहोचणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर केली. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे नेते दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांचा सखोल आढावा घेतील. तसेच परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचार करतील. यानंतर पंतप्रधान 09-10 जुलै 2024 दरम्यान ऑस्ट्रियाला भेट देतील. 41 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा असेल.

भारतीय समुदायाशी संवाद

पंतप्रधान मोदी या दौऱ्यात ऑस्ट्रिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतील. तसेच ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांच्याशीही चर्चा करतील. यादरम्यान भारत आणि ऑस्ट्रियातील व्यावसायिक नेत्यांनाही संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्को तसेच व्हिएन्ना येथे भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद साधतील. भारतीय समुदायाकडून पंतप्रधान मोदींचे जल्लोषी स्वागत होणार असून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल गौरवही केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article