For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर

06:53 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर
Advertisement

डिस्चार्जनंतर निवासस्थानीच आराम

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे आपल्या निवासस्थानीच आराम करत आहेत. गेल्या दहा दिवसात त्यांना दोनवेळा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जारी करण्यात आली आहे. निवासस्थानीही विशेष वैद्यकीय तज्ञांच्या मदतीने त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली जात आहे.

Advertisement

लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री 9 वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने हेल्थ बुलेटिन जारी केले. त्यानंतर गुरुवारी त्यांना ऊग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापूर्वी 26 जून रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. याच काळात त्यांच्यावर ऑपरेशनही करण्यात आले. ऑपरेशननंतर लालकृष्ण अडवाणी यांना ऊग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

भाजपचे 96 वषीय ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत आहेत. सध्या ते आपल्या निवासस्थानीच असून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. अडवाणी यांना यावषी देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही निवासस्थानीच प्रदान करण्यात आला.  प्रकृतीच्या कारणास्तव ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.

Advertisement
Tags :

.