For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर

06:17 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी महाराष्ट्रातील जळगावला येणार असून लखपती दीदी कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. ते सकाळी सव्वाआकराच्या आसपास जळगावला येतील. त्यांच्याहस्ते 11 लाख लखपती महिलांना प्रमाणपत्रे देण्यात येतील. त्यांच्याहस्ते 2 हजार 500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे उद्घाटनही पेले जाणार आहे. ते 2.35 लाख स्वसहाय्य गटांना 5 हजार कोटी रुपयांच्या बँक कर्जांचे वितरण करतील. या कर्जांचा लाभ 25.8 लाख सदस्यांना होणार आहे. लखपती दीदी कार्यक्रमाचा प्रारंभ गेल्या वर्षी करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आतापर्यंत एक कोटी महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भगिनींपैकी काहींशी ऑन लाईन संवादही साधणार आहेत. त्यानंतर त्यांचे राजस्थानमध्ये आगमन होणार असून ते राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम महोत्सवाच्या (अमृत महोत्सव) सांगता कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.