महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी आज जम्मू दौऱ्यावर

06:39 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

30,500 कोटींच्या विकास प्रकल्पांची ‘भेट’ देणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी जम्मूला भेट देणार आहेत. जम्मूतील मौलाना आझाद स्टेडियमवर आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यादरम्यान काही प्रकल्पांचे राष्ट्राला समर्पण करण्याबरोबरच अनेक योजनांची पायाभरणीही करतील. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, पेट्रोलियम, नागरी पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान जम्मू-काश्मीरमधील सुमारे 1,500 उमेदवारांना सरकारी भरतीच्या नियुक्तीपत्रांचे वितरण करतील. याशिवाय जम्मूमधील विजयपूर (सांबा) ‘एम्स’चे उद्घाटनही करतील. केंद्रीय क्षेत्र योजना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत फेब्रुवारी 2019 मध्ये याची पायाभरणी करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article