महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदींनी जाणले ‘चॅम्पियन टीम इंडिया’चे अनुभव

06:05 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुऊवारी येथे टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला आमंत्रित करून त्यांच्यासमवेत नाश्ता घेतला,. यादरम्यान अमेरिका व वेस्ट इंडिज यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सदर स्पर्धेतील संघाच्या अनुभवांवर संस्मरणीय संभाषण झाले, असे मोदींनी त्याविषयी माहिती देताना म्हटले आहे. न्याहारीसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी संघ मोठ्या धूमधडाक्यात दिल्लीत दाखल झाला. तिथे त्यांनी जवळपास दोन तास घालवले.

Advertisement

गेल्या आठवड्यात अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ चौथ्या श्रेणीच्या चक्रीवादळामुळे पाच दिवस ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे अडकला होता. त्यानंतर गुरुवारी पहाटे हा संघ दिल्लीला पोहोचला. ‘आमच्या चॅम्पियन्ससोबत एक उत्कृष्ट भेट. 7, एलकेएम येथे विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली आणि स्पर्धेतील त्यांच्या अनुभवांबद्दल संस्मरणीय संभाषण केले’, असे मोदींनी ‘एक्स’वर नमूद केले आहे. टीमसोबतच्या छायाचित्रांसह त्यांनी हा पोस्ट टाकला आहे. या छायाचित्रांत रोहित आणि मावळते मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पंतप्रधानांच्या दोन्ही बाजूंनी आहेत.

खेळाडूंनी केली आपापली छायाचित्रे शेअर

त्यानंतर अनेक खेळाडूंनी पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तो आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यामध्ये मोदी त्यांचा 10 महिन्यांच्या मुलगा अंगदला धरून आहेत.  कुलदीप यादवनेही त्याच्या पंतप्रधानासमवेतच्या संवादाची छायाचित्रे शेअर केली असून मोदींना मिठी मारताना तो भाविक झाल्याशिवाय राहिला नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि त्याचे आई-वडील मोदींसोबत हसत हसत पोज देताना दिसतात.

पंतप्रधानांना भेटणे हा मोठा सन्मान : कोहली

‘आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे हा किती मोठा सन्मान आहे. आम्हाला पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद’, असे स्टार फलंदाज आणि अंतिम लढतीत सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने इंस्टाग्रामवर नमूद केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक मिनिटाहून अधिक लांबीचा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये खेळाडू मोदींभोवती वर्तुळाकार बसून गप्पा मारताना दिसतात.

ट्रॉफीच्या डिजाईनचा केक, नाश्त्याला छोले भटुरे आणि बरंच काही

गुरुवारी पहाटे नवी दिल्लीत भारतीय संघाचे विमानतळावर जंगी स्वागत तर झालेच, शिवाय हॉटेलमध्ये खेळाडूंसाठी खास तयारीही करण्यात आली होती.  चाणक्यपुरी स्थित असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचे स्वागत करण्यासाठी खास नाश्ता आणि केकची व्यवस्था करण्यात आली होती. हा केक टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगात होता आणि त्यावर

चॉकलेटने बनवलेली टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी ठेवण्यात आली होती. टीम इंडियाच्या वेलकमसाठी 3 लेअरचा केक तयार करण्यात आला होता. जो कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि कोच राहुल द्रविड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी निघण्यापूर्वी कापला. कर्णधार रोहितला वडा पाव देण्यात आला होता. विराट कोहलीसाठी अमृतसरी शैलीतील छोले भटुरे तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. संघातील इतर खेळाडूंसाठी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात आले होते.

विमान कंपनीने केला रोहित-विराटचा सन्मान,दिल्ली-मुंबई फ्लाईटला दिले खास नाव

टीम इंडिया 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ मुंबईत पोहोचला. दरम्यान, टीम इंडिया दिल्लीहून विस्तारा एअरलाइन्सच्या खास विमानाने मुंबईत पोहोचली. या विमानाला खास नाव देण्यात आले. हे नाव रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जर्सीनंबर वरून देण्यात आले. रोहित आणि विराट आता टी 20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. भारतीय संघ ज्या विमानातून प्रवास मुंबईत दाखल झाला, त्याला ‘ळख्1845‘ असे नाव देण्यात आले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे जर्सी नंबर अनुक्रमे ‘18‘ आणि ‘45‘ आहेत. टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट आणि रोहित यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यांच्या सन्मानार्थ विस्तारा एअरलाइन्सने या फ्लाइट ट्रिपला ‘ळख्1845’ असे नाव दिले.

यात खेळाडूंनी एका प्रकारची जर्सी परिधान केली होती. त्यावर ठळक अक्षरात ’चॅम्पियन्स’ लिहिलेले होते. टीम इंडियाच्या वर त्यात दोन तारे देखील होते, जे दोन टी-20 विश्वचषक विजेतेपदे दर्शवत होते. सर्व जण पंतप्रधानांशी हसत हसत गप्पा मारण्यात गुंग झाल्याचे त्या व्हिडीओतून दिसून येते. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनीही पंतप्रधानांना ‘नमो’ आणि ’1’ असे लिहिलेली टीम इंडिया जर्सी भेट दिली.

ज्युनियर बुमराह पंतप्रधान मोदींच्या कडेवर

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने गुरुवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. संघातील सर्वच खेळाडूंनी पंतप्रधान मोदींसह ब्रेकफास्ट केला आणि विविध विषयांवर संवाद साधला. पंतप्रधानांनी वर्ल्ड कप विजयातले अनेक किस्से त्यांच्याकडून जाणून घेतले. याशिवाय, विजेत्या टीमसह फोटोसेशनही केले. या सर्व फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतले ते बुमराहच्या चिमुरड्याने. बुमराहने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो पत्नी संजना आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी बुमराहच्या मुलासोबत मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान, आज सकाळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आमंत्रित होणं ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. या क्षणांसाठी आणि पाहुणचारासाठी मोदी सरांचे खूप खूप आभार. असे ट्विट बुमराहने केले.

बार्बाडोस ते नवी दिल्ली, 16 तासांचा प्रवास

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article