महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी 6 रोजी गोव्यात

11:12 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय उर्जा सप्ताहानिमित्त दक्षिण गोव्यातील बेतूल येथे आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात दाखल होत आहेत. या भेटीदरम्यान ते राज्यातील 7 महत्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या दौऱ्याबद्दल मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. या भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते ज्या 7 महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे, त्यात कुंकळ्ळी येथील एनआयटी, दोनापावला येथे वॉटर स्पोर्ट्स, बेती येथील कमांडंट नौदल महाविद्यालय, पणजी-रेईश मागूस दरम्यान रोपवे, कुडचडेतील कचरा प्रकल्प, साळावली नदीवर 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प आणि राजधानीतील पाटो भागात थ्री डी इमारत, आदी प्रकल्पांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री. डॉ. सावंत यांनी दिली. बेतुल येथील भारतीय आंतरराष्ट्रीय उर्जा सप्ताहात 38 राष्ट्रे सहभागी होत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article