महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान 27 रोजी गोव्यात

12:59 PM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्कोत होणार जाहीरसभा : अमित शहांची सभा लांबणीवर

Advertisement

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 एप्रिल रोजी गोव्यात येणार असून, वास्को येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 24 एप्रिल रोजी म्हापशात जाहीर सभा होणार होती. परंतु देशातील इतर राज्यांत लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने त्यांची म्हापशातील नियोजित सभा पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यातील प्रत्येक जागांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे लक्ष आहे. गत लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघातील जागा केवळ 9 हजार 500 मतांनी भाजपला गमवावी लागली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दक्षिणची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ गमवावा लागू नये, यासाठी पंतप्रधान मोदी यांची ही सभा होणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article