For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगी आदित्यनाथांवर राजीनाम्यासाठी दबाव!

06:23 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
योगी आदित्यनाथांवर राजीनाम्यासाठी दबाव
Advertisement

राकेश टिकैत यांचा मोठा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाजप नेतृत्वाकडून कोंडी सुरू झाल्याचा दावा केला आहे. योगी आदित्यनाथांवर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे, कारण उत्तरप्रदेशात भाजपने बहुतांश जागा गमाविल्या आहेत. भाजपची उत्तरप्रदेशातील ही स्थिती दिल्लीतील नेतृत्वामुळे झाली आहे. भाजपच्या हुकुमशाहीमुळे उत्तरप्रदेशातील उमेदवार पराभूत झाल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

Advertisement

भाजप अन्य पक्षांमध्ये फूट निर्माण करण्याचे काम करते. भाजपने हरियाणातील चौताला परिवारात फूट पाडली आहे. पंजाबमध्ये बादल परिवारातही भाजपने फूड घडवून आणली. 2024 मध्ये भाजपने मायावती यांचा पक्ष संपुष्टात आणला, याचबरोबर हरियाणात चौताला यांचा पक्ष अस्तित्वहीन झाला. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे अद्याप तग धरून असले तरीही ते भाजपच्या कटाला बळी पडतील. नितीश कुमार जोपर्यंत राजकीय यु-टर्न घेत राहतील तोपर्यंत ते टिकून राहतील असा दावा टिकैत यांनी केला आहे.

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकले तरच योगींना 2034 मध्ये पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून घोषित करण्याचा भाजपचा प्लॅन आहे. केंद्र सरकारमध्ये भाजपला अधिक बोलणारा आणि स्वत:च्या बुद्धीनुसार वागणारा नेता नको आहे. भाजपच्या नेतृत्वाला अधिक मजबूत नेते नको असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.