For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परप्रांतीयांवर काश्मीर खोरे सोडण्यासाठी दबाव

06:40 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
परप्रांतीयांवर काश्मीर खोरे सोडण्यासाठी दबाव
Advertisement

मेहबूबा मुफ्तींचा प्रशासनावर गंभीर आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी गांदरबल दहशतवादी हल्ल्यासंबंधी मंगळवारी मोठे वक्तव्य केले आहे. गांदरबलमध्ये झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासन परप्रांतीय कामगरांना त्वरित काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्यासाठी दबाव निर्माण करत आहे. अशाप्रकारचे पाऊल उचलणे योग्य नाही. यामुळे केवळ अधिक समस्या निर्माण होतील आणि देशात अत्यंत चुकीचा संदेश जाणार असल्याचा दावा मुफ्ती यांनी केला आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडेच शांततेत आणि दहशतीपासून मुक्त वातावरणात निवडणूक पार पडली आहे. आता अशाप्रकारच्या प्रतिक्रियेमुळे अन्य राज्यांमध्ये काम करणारे आणि शिकत असलेल्या काश्मिरींच्या विरोधात नाराजी निर्माण होऊ शकते. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हस्तक्षेप करावा आणि परप्रांतीयांना किमान मुदत द्यावी असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील श्रीनगर-लेह महामार्गावर भुयाराच्या निर्मितीस्थळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि 6 कामगारांचा मृत्यू झाला होता.

सत्य लपविता येत नाही

पीडीपी नेत्या आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा यांनीही गांदरबल हल्ल्याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणूक किंवा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यासारख्या मोठ्या आयोजनांमुळे काश्मीरची समस्या लपविता येणार नाही. काश्मीरमध्ये एक अशी समस्या आहे, जी दशकांपासून निर्दोष लोकांचा जीव घेत आहे. ही समस्या सोडविण्याकरता तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात नाहीत तोवर ती कायम राहणार असल्याचे इल्तिजा यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.