महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीलंकेत 21 सप्टेंबरला राष्ट्रपती निवडणूक

06:20 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नव्या सरकारसमोर असणार अनेक आव्हाने

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

श्रीलंकेत 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. श्रीलंकेच्या निवडणुक आयोगाने याची घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर यापूर्वी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यकाळाला विस्तार देण्यासाठी राष्ट्रपती निवडणूक टाळली जाऊ शकते अशी चर्चा होती.

75 वर्षीय विक्रमसिंघे यांनी जुलै 2022 मध्ये पदभार सांभाळला होता. तेव्हा गंभीर आर्थिक संकटामुळे व्यापक निदर्शनांनंतर ततत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडून पलायन करावे लागले होते आणि नंतर राजीनामा द्यावा लागला होता. संसदेने विक्रमसिंघे यांना उर्वरित 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी राष्ट्रपती म्हणून निवडले होते. तर आता विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा आणि खासदार अनुरा कुमार दिसानायके राष्ट्रपतिपदासाठी प्रमुख दावेदार असणार आहेत.

श्रीलंकेच्या 2.20 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 1.70 कोटी लोक मतदानात भाग घेण्यासाठी पात्र आहेत. 2.9 अब्ज डॉलर्सच्या आयएमएफच्या बेलआउट पॅकेजच्या मदतीने विक्रमसिंघे यांनी देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा उभी केली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये महागाईचा दर 70 टक्के होता, जो मागील जून महिन्यात 1.7 टक्क्यांवर आला. तर श्रीलंकेच्या चलनाचे मूल्यही वाढले आहे. तसेच देशाकडील विदेशी चलन साठाही उल्लेखनीय पातळीवर आला आहे.

श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत चालू वर्षात 3 टक्के वृद्धी होण्याची अपेक्षा आहे. तर मागील वर्षी अर्थव्यवस्थेत 2.3 टक्क्यांची घसरण झाली होती. जपान, चीन आणि भारतासह अनेक देशांनी मागील महिन्यात 10 अब्ज डॉलर्सच्या कर्ज पुनर्रचना प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने श्रीलंकेला चार वर्षांसाठी कर्जाची परतफेड स्थगित करणे आणि 5 अब्ज डॉलर्सचा निधी राखता येणार आहे.

श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांना उलटण्याचा प्रयत्न केल्यास देशात एक नवे संकट जन्माला येऊ शकते असे विश्लेषकांचे सांगणे आहे. अर्थव्यवस्थेच्या सुधारणांना पुढे नेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी नव्या सरकारवर असणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article