महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रपती आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर

06:33 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिल्या टप्प्यात अल्जेरियाला रवाना : 7 दिवसात तीन देशांना भेट देणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी आफ्रिकेतील तीन देशांच्या सात दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीहून अल्जेरियाला रवाना झाल्या. द्रौपदी मुर्मू 13 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींद्वारे या तीन आफ्रिकन देशांना भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती या दौऱ्यात तेथील नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील आणि भारतीय समुदायाशी संवाद साधतील.

अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल मादजीद तेब्बौने यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती मुर्मू सुरुवातीला अल्जेरियात जाणार आहेत. 15 ऑक्टोबरपर्यंत त्या या आफ्रिकन देशात राहणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या भेटीमुळे भारत आणि अल्जेरिया यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ होतील. तेल, वायू, संरक्षण आणि अंतराळ सहकार्य यासारख्या धोरणात्मक क्षेत्रात दोन्ही देश चर्चा करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही राष्ट्रपतींमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. कौन्सिल ऑफ नेशन (अल्जेरियन संसदेचे वरिष्ठ सभागृह) आणि नॅशनल पीपल्स असेंब्ली (कनिष्ठ सभागृह) यांच्या अध्यक्षांसह अनेक अल्जेरियन मान्यवर देखील या बैठकीला उपस्थित राहतील. याशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील एका कार्यक्रमातही संबोधित करतील.

अल्जेरियानंतर 16 ऑक्टोबर रोजी मुर्मू उत्तर आफ्रिकेच्या या देशातून शेजारी देश मॉरिटानियाला भेट देतील. मॉरिटानिया सध्या आफ्रिकन युनियनचा प्रमुख देश आहे. मॉरिटानियाला पोहोचल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू त्यांचे समकक्ष मोहम्मद उलद चेख अल गझौनी यांच्याशी चर्चा करतील. मॉरिटानियाचे पंतप्रधान मुख्तार उलद दाजे आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद सलीम उलद मारझोक यांचीही त्या भेट घेतील. तसेच भारतीय समुदायातील लोकांशीही संवाद साधतील. त्यांच्या या भेटीमुळे भारत-मॉरिटानिया द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

मलावीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद

अंतिम टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मलावी येथे वास्तव्य करतील. याप्रसंगी त्या मलावीच्या प्रमुख नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. यानंतर त्या देशातील व्यापारी आणि उद्योग क्षेत्रातील नेते आणि प्रवासी भारतीयांशी संवाद साधतील. तसेच मलावीमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांनाही भेट देणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article