For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास

06:48 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी दिल्लीची जीवनरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रोच्या सुविधाजनक प्रवासाचा अनुभव घेतला आहे. राष्ट्रपतींच्या मेट्रोप्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरवासीयांच्या दैनंदिन अनुभवाशी जोडून घेणे हा राष्ट्रपतींच्या मेट्रोप्रवासामागील उद्देश होता.

मेट्रोतून प्रवासादरम्यान त्यांच्या आसपास दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अनेक अधिकारी असल्याचे व्हिडिओत दिसून येते. या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना मेट्रोच्या संचालनासंबंधी माहिती पुरविली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा दिल्ली मेट्रोतून प्रवास केला आहे. त्यादरम्यान त्यांनी सर्वसामान्यांसोबत संवाद साधला होता. तसेच दिल्ली मेट्रोच्या संचालनाची माहिती जाणून घेतली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.