For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘फ्यूरियोसा’चा ट्रेलर सादर

06:05 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘फ्यूरियोसा’चा ट्रेलर सादर
Advertisement

नव्या अवतारात परतली आन्या टेलर-जॉय

Advertisement

2015 मध्ये प्रदर्शित दिग्दर्शक जॉर्ज मिलर यांचा ‘मॅड मॅक्स : फ्यूरी रोड’चा प्रीक्वेल जवळपास 8 वर्षांनी प्रदर्शित होत आहे. पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. आता प्रेक्षक चित्रपटचा प्रीक्वेल ‘फ्यूरियोस : ए मॅड मॅक्स सागा’साठी उत्साहीत आहेत. निर्मात्यांनी आता याचा ट्रेलर सादर केला असून यात आन्या टेलर जॉयचा नवा अवतार दिसून आला आहे.

वॉर्नर ब्रदर्सनी जॉर्ज मिलरच्या डायस्टोपियन अॅक्शन महाकाव्याचा नवा ट्रेलर सादर केला आहे. हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मॅड मॅक्स फ्रेंचाइजीच पाचवा चित्रपट फ्यूरियोसा हा 2015 मधील ‘मॅड मॅक्स : फ्यूरी रोड’चा प्रीक्वेल आहे. मागील चित्रपटात इम्पीरेटर फ्यूरियोसाच्या स्वरुपात चार्लीज थेरॉनने मुख्य भूमिका साकारली होती. नवा चित्रपट फ्यूरियोसा म्हणजेच आन्या टेलर जॉयवर केंद्रीत असून जिचे बालपणी वॉरलॉर्ड डिमेंटस म्हणजेच क्रिस हेम्सवर्थकडून अपहरण करण्यात आले होते. ती अनेक मातांच्या ग्रीन प्लेसमध्ये स्वत:च्या घरी परत जाण्यासाठी स्वत:ला तयार करत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.

Advertisement

फ्यूरियोसा : ए मॅड मॅक्स सागा चित्रपटात टॉम बर्क, एंगस सॅम्पसन, डॅनियल वेबर, नाथन जोन्स हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. प्रीक्वेलमध्ये फ्यूरी रोडचा खलनायक इम्मॉर्टन देखील दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :

.