सुकूर पंचायतीत आज कॉरिडॉरवर सादरीकरण
12:30 PM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : पर्वरी भागात निर्माणाधीन असलेल्या सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामाचे तपशीलवार सादरीकरण बुधवार दि. 11 रोजी सुकूर ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात येणार आहे. त्यासंबंधी सुकूर ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. सुमारे 5 किमी लांबीचा हा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग 66 वर अॅप्रोच रोड येणार आहे. ईपीसी तत्त्वावर या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता पंचायत कार्यालयात हे सादरीकरण होणार आहे. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे सरपंच सोनिया पेडणेकर यांनी कळविले आहे.
Advertisement
Advertisement