केशवराव नाट्यगृहाच्या पुर्नबांधणी आराखड्यासाठी 6 जणांचे सादरीकरण
कंपन्यांनी केले सादरीकरण, सोमवारपर्यंत कंपनी नियुक्तीसाठी हालचाली
संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यागृहाचा पुर्नबांधणी आराखडा तयार करण्यासाठी 6 कंपन्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण केले. केशवराव भोसले नाट्यागृहाचे मुळ रुप तसेच ठेवून नाट्यागृह उभारणीचा आराखडा या कंपन्यांनी सादर केला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह समितीसमोर हे सादरीकरण करण्यात आले. येत्या दोन दिवसांमध्ये कंपनी अंतिम करुन सोमवारपासून आराखड्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.
केशवराव भोसले नाट्यागृहा गुरुवार (8 ऑगस्ट) रोजी भिषण आग लागली. यामध्ये नाट्यागृहासह आतील खुर्च्या, खासबाग मैदानाचे व्यासपीठ यांचे 17 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यागृहा 25 कोटी रुपयांची घोषण केली. मात्र नाट्यागृहास एwतिहासिक वारसा असून ते आहे त्या रुपात उभे करावे अशी मागणी कलाप्रेमींसह, कृती समितीकडून होवू लागली. महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडीट आणि नाट्यागृहाच्या पुर्नबांधणीचा आराखडा तयार करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया सुरु केली. कन्स्टल्टंट नेमत असताना यामध्ये मुळ रुप तसेच ठेवून पुनर्बांधणी करण्याची अट महापालिकेच्या वतीने घालण्यात आली. केशवराव भोसले नाट्यागृहाच्या आराखडा तयार करण्यासाठी 6 कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. यामध्ये कोल्हापूरातील 2, मुंबई येथील 2, पुणे, नाशिक येथील कंपन्यांनी या निविदा भरल्या होत्या. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी नाट्यागृहाचा मुळ ढाचा तसाच ठेवून त्याला अत्याधुनिक रुप देण्यात आले आहे.
यावेळी बैठकीस शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ आर्किटेक्चरच्या संगीता भांबुरे, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, इंद्रजीत नागेशकर, रविकिशोर माने, संदीप घोरपडे, विजय गजबर, विजय कोराणे, उदय गायकवाड उपस्थित होते.
या कंपन्यांनी केले सादरीकरण
आराखड्याचे सादरीकरण करण्यासाठी 6 कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. यामध्ये मिलींद पाटील, एन. एस. पाटील, चेतन रायकर, योगेश पाटील, अमरजा निंबाळकर, अमोल पाटणकर यांनी सादरीकरण केले.
मुळ रुप तसेच
केशवराव भोसले नाट्यागृह राजर्षी शाहू महाराज यांनी उभे केले आहे. याला एwतिहासिक वारसा असल्यामुळे याचे मुळ रुप तसेच ठेवण्याची मागणी होत होती. याचा विचार करुन कंपन्यांनी आराखड्याचे सादरीकरण केले आहे. यामध्ये नाट्यागृहाचे बाह्य रुप दगडी तसेच पुरातत्व विभागाच्या निकषांप्रमाणे असेल मात्र आतील रुप अत्याधुनिक सोई सुविधांप्रमाणे करण्यात आले आहे.