For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लगबग तुळशी विवाहाच्या तयारीची

11:49 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
लगबग तुळशी विवाहाच्या तयारीची
Advertisement

तुळशीवृंदावने सजरी, बाजारपेठ फुलली : उद्यापासून प्रारंभ होणार तुळशीविवाह

Advertisement

पणजी : राज्यात उद्या मोठ्या उत्साहात मोठी दिवाळी म्हणजे तुळशी विवाह सोहळा साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पणजी बाजारपेठात तुळशी विवाहसाठी लागणारे साहित्य ऊस, चिंचेची फांदी, आवळ्याची फांदी, दिंड्याची काठी, आंब्याच्या ताळा व इतर साहित्य मिळून 200 ते 250 ऊपये दराने विकले जात आहे. दसरा, दिवाळी उत्सव साजरा झाल्यानंतर नागरिकांना वेध लागते ते कार्तिक एकादशी आणि तुळशीविवाहाचे. थोरली दिवाळी म्हणून तुळशीविवाह उत्सव साजरा केला जातो. दिवाळीसाठी घरासमोर लावलेले आकाशदीप, विजेची रोषणाई, नित्य रात्री पणत्याची केली जाणारी आरास ही तुळशीच्या लग्नापर्यंत चालू ठेवलेली असते. तुळशीच्या लग्नानिमित्त अंगणातील तुळशीवृंदावनाची स्वच्छता करून रंगरंगोटीचे काम गेल्या तीनचार दिवसापासू सुरु असून आता हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

 उद्यापासून तुळशीविवाह प्रारंभ 

Advertisement

आज गुऊवारी प्रबोधिनी एकादशी आहे आणि उद्या चातुर्मास संपतो आहे. यानंतर तुळशी विवाह व त्यानंतर लग्नकार्य, मुंज यासारखी सर्व शुभकार्ये सुरू होतात. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. यंदा उद्यापासून तुळशी विवाह प्रारंभ होत आहे.

 जोडवी पेटविण्याची परंपरा

बाजारात तुळशी विवाहासाठी लागणारे दिंडा, ऊस, चिंचा, आवळे, पोहे, चुरमुरे, लाह्या, जोडवी, कापूर आदींसह सर्व साहित्य उपलब्ध झाले आहे. बऱ्याच जणांच्या घरी ब्राह्मणांकरवी तुळशीची पूजा करून मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न केले जाते. त्यानंतर सुवांसिनी जोडवी पेटवून तुळशीची ओवाळणी करतात, हे गोव्यातील तुळशीविवाहाचे वैशिष्ट्या आहे.

Advertisement
Tags :

.