कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

56 व्या ‘इफ्फी’ महोत्सवाची जय्यत तयारी

12:23 PM Jul 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा : इफ्फीची महती पोहोचली आता साता समुद्रापार

Advertisement

पणजी : तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नातून गोव्यात सुरू झालेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) महती आता साता समुद्रापार पोहचल्याने गोव्याची कला क्षेत्रात जागतिक पातळीवर विशेष ओळख झाली आहे. आगामी 56 वा इफ्फी महोत्सव साजरा करण्यासाठी सुकाणू समितीची पहिली बैठक काल शुक्रवारी मुंबईत झाली. मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, गोवा सरकारच्यावतीने  व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम तसेच भारत आणि जागतिक चित्रपट उद्योगातील सुकाणू समितीच्या सदस्यांचे पॅनेल अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत इफ्फी 2025 साठी धोरणात्मक नियोजनावर विशेष भर देण्यात आला. महोत्सवाची समावेशकता, जागतिक स्थान आणि सार्वजनिक सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी, संपर्काची व्याप्ती, प्रतिभावंताचा सहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली.

Advertisement

नोव्हेंबरमध्ये होणार महोत्सव 

56 वा इफ्फी महोत्सव गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर  2025 या  कालावधीत  आयोजित होणार आहे. तऊणांवर नव्याने लक्ष केंद्रित करत, हा महोत्सव विद्यार्थी चित्रपट निर्माते आणि तऊण आशय निर्मात्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल. विशेष प्रकारे रचना केलेले मास्टरक्लासेस, उद्योग कार्यशाळा आणि नवीन कलाकारांना जागतिक मार्गदर्शकांशी जोडणारे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म यांचा यात समावेश आहे.

वेव्ह्ज फिल्म बाजाराचे आयोजन

इफ्फीसोबतच नव्याने रिब्रँडिंग करण्यात आलेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या चित्रपट बाजाराचे आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट व्याप्तीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या वेव्ह्ज फिल्म बाजाराचे आयोजन करण्यात येईल. फिल्म बाजारचे वेव्हज फिल्म बाजार असे पुनर्ब्रँडिंग करण्यावर सुकाणू समितीने चर्चा केली आणि त्याला मान्यता दिली.

सदस्यांची संख्या झाली 16 वरून 31

महोत्सवाच्या डिझाइनमध्ये अधिक समावेशकता आणि सर्जनशील अंतर्दृष्टी  वाढवण्यासाठी सुकाणू समितीचा लक्षणीय विस्तार करण्यात आला असून  सदस्यांची संख्या 16 वरून 31 करण्यात आली आहे. त्यामधून  एक अधिक वैविध्यपूर्ण आणि उद्योग-प्रतिनिधी मंडळ प्रतिबिंबित होत आहे. समितीमध्ये अनुपम खेर, गुनीत मोंगा कपूर, सुहासिनी मणिरत्नम, खुशबू सुंदर, पंकज पराशर, प्रसून जोशी यांसारख्या नामांकित आणि सिनेमा, निर्मिती, माध्यम आणि सांस्कृतिक नेतृत्वातील समृद्ध कौशल्ये असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article